हार्दिक पांड्या भविष्यामध्ये जगातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू बनू शकतो असे भाकीत क्लूजनर यांनी केले आहे. ‘हिंदुस्थानच्या पहिल्या डावात हार्दिक पांड्याने जबरदस्त खेळी करत प्रभावित केले आहे. पांड्याने दबावामध्ये फटकेबाजी करत आफ्रिकेच्या संघावर दबाव निर्माण केला. भविष्यामध्ये पांड्या हिंदुस्थानकडून सर्वोत्तम कामगिरी करू शकतो, असे क्लूजनर म्हणाले. पांड्या आंतर राष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या नवखा आहे. मर्यादित षटकांच्या खेळामध्ये पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्याने आणखी वेगाने गोलंदाजी केली तर तो विश्वातील सर्वेश्रेष्ठ अष्टपैलू बनू शकतो, असेही क्लूजनर म्हणाले.कसोटीमध्ये ‘लंबी रेस का घोडा’ होण्यासाठी त्याने अधिक वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायला हवा, असा सल्ला क्लूजनर यांनी पांड्याला दिला आहे. तसेच प्रत्येक वेळी तुम्हाला हवी तशी फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येणार नाही. त्यामुळे संयम न ढळता तुम्ही तुमच्या प्रदर्शनावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे, असेही क्लूजनर म्हणाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews